पं. वसंतराव देशपांडे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे नातू राहुल देशपांडे गेल्या वषीर्पासून वसंतोत्सव आयोजित करत आहेत. आज या महोत्सवाची पुण्यात सांगता होत आहे. या महोत्सवात राहुल देशपांडे यांचा पहिला राष्ट्रीय अल्बम प्रकाशित झाला. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
..................
* पुण्यात शास्त्रीय संगीताच्या मैफिली नव्या नाहीत. वसंतोत्सवाचे वेगळेपण काय?
माझ्या मते पुण्यातही पारंपरिक श्रोता कमी होत आहे. एकाच गायकाच्या मैफलीला चार-चार तास मांडीही न हलवता बसून राहणारा रसिक आता फारसा उरला नाही; त्या तोडीचे गायकही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहेत. पण त्याचबरोबर तरुण मंडळींना शास्त्रीय संगीताबद्दल औत्सुक्य वाटते आहे, त्यांना गझल ऐकावी असे वाटते, सुफी संगीत त्यांना आवडते, भजनांमुळेही ही मंडळी हेलावतात. या ऑडियन्ससाठी काहीतरी वैविध्यपूर्ण आणि दजेर्दार देण्याचा प्रयत्न वसंतोत्सवातून आम्हाला करायचा आहे. म्हणूनच गेल्या वेळी पहिलेच वर्ष असतानाही विश्वसंगीत ही नवी संकल्पना घेऊन आम्ही पुणेकरांसमोर आलो होतो.
* यंदाही वसंतोत्सवात विश्वसंगीताचा समावेश आहेच; गेल्या वषीर्च्या प्रतिसादामुळेच तसा निर्णय घेतला का?
गेल्या वषीर् आम्हाला मिळालेला प्रतिसाद खरोखर आनंद आणि प्रेरणा देणारा होता. मागच्या वेळी ज्येष्ठ सुफी गायिका अबीदा परवीन यांचा कार्यक्रम होता. अनेकांना त्यांना ऐकता येणार म्हणून खूप आनंद झाला होता; तर कितीतरी जणांनी कोण ही अबीदा, असाही प्रश्ान् विचारला. पण सीझन तिकीटांमुळे चला जाऊन तर बघू, असे म्हणत तेही पुणेकर आले आणि नंतर कित्येकांनी आवर्जून कार्यक्रम आवडल्याचे सांगितले. विशेषत: सध्याच्या पॅकेजच्या जमान्यात तरुण रसिकांना एका महोत्सवात अशा विविध प्रकारचे परफार्मन्सेस जास्त आवडतात. या प्रयोगशीलतेमुळेच माझ्या वयाची पिढी शास्त्रीय संगीताकडे ओढली जाईल. कारण कार्यक्रमाचे स्वरूप काहीही असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक परफॉर्मर शास्त्रीयच गात किंवा वाजवत असतो.
* मग तरुण पिढी पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळते आहे, असे वाटते का?
निश्चित. केवळ ऐकणारीच नाही; तर प्रत्यक्ष गाणे शिकण्याकडेही ओढा वाढला आहेच. आताच असे नाही, तर मला वाटते गेल्या काही वर्षांपासूनचे हे चित्र आहे. पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, माझे आजोबा, मल्लिकार्जुन मन्सूर अशा अनेक दिग्गजांची एक पिढी होती. पण त्यानंतरच्या पिढीत मात्र त्या तोडीचे खूप गायक झाले नाहीत, असे वाटते. उस्ताद राशीद खान किंवा पं. अजय चक्रवतीर् अशी काही मोजकी मंडळी त्याला अपवाद आहेतच. पण त्यानंतरच्या आमच्या पिढीत मात्र पुन्हा गाणे शिकणाऱ्या मंडळींमध्ये वाढ झाली आहे. शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, कौशिकी चक्रवतीर् अशी अनेक नावे आता सांगता येतात. शिकणाऱ्यांसाठी आता साधनेही खूप आहेत. एकदा गुरूजवळ तुमचा पाया पक्का झाला की तुम्ही विविध गायकांचा सीडीवरून अभ्यास करू शकता. त्यामुळे तुमचे करिअर, इतर व्याप सांभाळूनही ते जमू शकतो. त्यामुळेही शिकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. एवढेच नव्हे तर वसंतोत्सव पार पाडण्यासाठी आमच्यासोबत असणारे कार्यकतेर्ही १८ ते २५ या वयातीलच आहेत आणि ते केवळ संगीताच्या प्रेमापोटी एकत्र येत आहेत.
* पण शिकणाऱ्यांपैकी किती जण करिअर करू शकतात आणि ऐकणाऱ्यांपैकी किती जाणकार असतात?
गाणे शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गवय्या व्हावे, अशी अपेक्षा कशी धरणार? ती क्षमता आणि जिद्द असलेली मुले या क्षेत्रात निश्चित पुढे येत आहेत. पण गाणे शिकणाऱ्या मंडळींमधून कानसेन तयार होतात, हीदेखील केवढी मोठी गोष्ट आहे. पुण्यात तसा रसिक वर्ग आहे, नवा तयार होत आहे. उद्या मी एखाद्या मैफिलीत चुकीचा स्वर लावला तर माझा कान धरणारा जाणकार येथे आहे, याची मला चांगली जाणीव आहे. तरुणांमध्येही गाणे समजून घेण्याची इच्छा खूप आहे. सोहोनी भटियार राग गायला, तर मला फोन करून विचारतात. यातला सोहोनी कळला, भटियार कोठे होता, ऑर्कुटवर स्क्रॅप पाठवून तरुण मंडळी अशा शंकांचे समाधान करून घेतात. १० वर्षांपूवीर् मैफिलीत केवळ म्हातारी मंडळी दिसायची, आता राज्यात कोठेही जात. तरुण वर्गाची संख्याच जास्त असते.
* वसंतोत्सवासाठी आणि वैयिक्तक करिअरमध्ये कोणती स्वप्ने तुम्ही सध्या बघताय?
वसंतोत्सवासाठी अनेक कल्पना डोक्यात आहेत; पण त्याबद्दल योग्य वेळीच बोललेले बरे. मला स्वत:ला गझल शिकायची आहे, गझलचा एखादा अल्बम काढायचा आहे, त्यासाठी अभ्यास सुरू आहे. शिवाय शास्त्रीय संगीतातही शिकण्यासारखे अजून खूप आहे. तो एक न संपणारा प्रवासच आहे. त्यामुळे आणखी बरेच काही साध्य करायचे आहे, ते रसिकांपर्यंत पोहचवायचे आहे.
* तुमच्या नव्या अल्बमबद्दल काही सांगाल का?
राष्ट्रीय पातळीवर हा माझा पहिलाच अल्बम आहे. सारेगामा इं. लि.(पूवीर्ची एचएमव्ही) ने काढलेल्या 'इन्ट्रोड्युसिंग' या अल्बमचे प्रकाशन वसंतोत्सवातच नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले. आजोबांनी एचएमव्हीसाठी गायलेले मारवा, राज कल्याण आणि परज हे रागच मी त्यात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गायले आहेत.
सौ: म. टा.
Monday, January 12, 2009
Sunday, January 11, 2009
Subscribe to:
Posts (Atom)