Sunday, February 28, 2010

प्रवाह :: भाग २

भाग २

विमानतळावर पोहचताच सामान चेकिनच्या रांगेत मी पहिलाच पाहून आनंद वाटला व उर्वरित प्रवास चांगला होणार याची पण चाहूल लागली. पण जसा जसा मी जास्त वेळ घालवू पाहत होतो तस तशी मला एक गोष्ट पटत होती की ज्या त्या गोष्टी त्यांच्या वेळेनुसरच होणे चांगले! ना फार आगोदर ना फार उशिरा! हे सगळे चेकिंग नंतरच्या वेटिंग मुळे कळले. आणि समजले की अनेक कारणानं  पैकी हे एक कारण आहे की ज्यामुळे मी या ट्रिप टाळतो एक तर मोठा प्रवासाचा वेळ आणि त्यात हा वेटिंग टाइम.

तशी लहानपणापासूनच मला प्रवासाची आवड. बराचसा प्रवास त्यावेळी बस नेच केलेला. पण त्या वेळेस कोणी ना कोणी तरी एस टी स्टॅंड वर सोडण्या साठी येत होते आणि बस चालू झळी की टाटा करून निरोप घेत होते. याच नेमक्या पद्धतीची आठवण आज मला प्रकर्षाने आली आणि त्या निरोप देणार्‍या नातेवाईकांची किंमत समजली. या छोट्या छोट्या गोष्टी पण किती महत्वाच्या असतात याची प्रचीती आली. कोणी तुम्हाला भेटण्यासाठी घरी आले आणि तुम्ही त्याला सोडण्या साठी साधे अपार्टमेंट च्या पार्किंग मधे वा जवळच्या बस स्टॉप अगर रिक्षा स्टॅंड पर्यन्त्र जरी गेलात तरी त्याला किती बरे आणि आपलेसे वाटते ते तुम्हाला नाही या अनुभवा शिवाय नाही कळणार. वाचून जरा हे पटणार नाही पण पहा कधी तरी फॉलो करून मग तो / ती पण पहा पोहोचल्याचा फोन / एस एम एस करतो / करते की नाही ते.

या ट्रिप मधे मला विमान प्रवासाचे काही अप्रूप नव्हते त्यामुळे मी विंडो सीट घेतली नव्हती. अजूनही मला माझी पहिली विमानाची ट्रिप आठवली की हसू येते. त्या वेळेस विंडो सीट साठी आटापिटा करून विमानत बसलो पण तो आनंद काही वेळच टिकला कारण एकदा टेक ऑफ झाले की शुभ्र ढगांची चादर सगळी कडे दिसत होती ती तरी किती वेळ पाहणार. एरव्ही बस नाही तर रेलवेच्या प्रवासात खिडकीतून बाहेर पाहण्यात जी मजा आहे ती एथे नाही हेच खरे.

मागील लिंक्स

प्रस्तावना
भाग १