Sunday, May 16, 2010

प्रवाह :: भाग - ६

प्रवाह भाग - ६

बऱ्याच दिवसात जुनी हिंदी गाणी ऐकली नव्हती म्हणून आज online radio tune केला आणि "जुस्त जू जिसकी थी उसको ..." या गाण्याचे शेवटचे कडवे चालू होते... "उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने..." आह S हा क्या बात है! काय ती रचना आणि तितकाच तोडीचा आशाजींचा आवाज. अशा या माहोल मध्ये विचार करताना मनाला जाणवले कि या एकटे पणामुळे बराच वेळ मिळतो नाही माणसाला?

नाही तर तुम्ही पहाना कोणीही onsite ला आलेला bachelor एकतर laptop नाही तर फोन वर दिसतो. बर हे फोन आणि laptop आणि त्यावरचे fwd एमैल्स, movies etc याचा हळू हळू कंटाळा येऊ लागतो मग वेळ घालवण्यासाठी नवीन नवीन options पहिले जातात. ट्रिप Adviser साईट पिंजून काढली जाते आणि लॉंग आणि शोर्ट पल्ल्याच्या पिकनिक स्पॉटची यादी केली जाते आणि नॉर्मल वीकेंड आणि लॉंग वीकेंड अशी विभागणी करून हे बेत पूर्णत्वाला नेले जातात. हळू हळू करत सगळे स्पॉट पाहून होतात. काही तर परत परत पाहून होतात. मग परत ये रे माझ्या मागल्या!

यातूनच मग "कीप इन टच" ला निभावण्यासाठी socalism चालू होते. Linked IN , ओर्कुट, facebook एक न अनेक साईट हेच कमी कि काय म्हणून लोकल मीट अप groups जॉईन केले जातात. Linked इन मधील नंबर आणि facebook / ओर्कुट मधील मित्र मैत्रिणींची गर्दी पाहून मन खुश होते आणि या plante वर आपण किती connected आहोत असे वाटते. नव्याचे नऊ दिवस होतात. एका निवांत क्षणी स्व: ताशीच विचार करताना मन विचारते हे Virtual Frined चा नंबर काय देतो तुला? हेच विश्व किती वेगळे होते काही वर्षा पूर्वी... ज्या वेळेस आपण सर्व मित्र एखाद्या चहाच्या दुकानात वा टपरीवर एकत्र जमून गप्पा टप्पा मारत होतो नाही तर तिलक वरचा वडा पाव आणि कटिंग . खरेच तीच जागा तीच मजा या ई स्पेस वर आहे का ? एखादा कूल scrap / tweet तितकाच आनंद देतो का जितका तुम्ही अचानक टपरीवरच्या मित्राला टपली देऊन आपले अस्तित्व दाखवता तेंव्हा, कि ज्या वेळी आपल्या नवीन पी जे ला टाळी मिळाली होती तेंव्हा, वा आपल्या चारोळीला वाह S वा मिळाली होती तेंव्हा. म्हणूनच हि ई - स्पेस एका मृगजळा सारखी भासते जिथे तुम्हाला मित्रांना भेटण्याचा बेगडी आनंद मिळतो त्याची तुलना आपल्या कट्ट्याशी कधीच करता येणार नाही!

असो अशी सत्याची ओळख होता होताच मग आपले जुने छंद आठवायला लागतात. शाळेत असताना दिलेल्या तबल्याच्या / पेटीच्या / गाण्याच्या / चित्रकलेच्या परीक्षा आठवतात. या चिमण्यांनो परत फिरा रे सारखे परत एकदा हे सगळे चालू करायला हवे याची आर्त जाणीव होते आणि मग शोधाशोध चालू होते. जुन्या पुस्तकांची , साहित्याची, मराठी मंडळाची , साहित्य मंडळाची ई. ची. परत एकदा रियाझ, तालीम चालू होते.

एकदम तंद्री भंग झाली ते रेडिओ वरच्या बदललेल्या गाण्याने "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..."


मागील लिंक्स...


प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५