Monday, April 12, 2010

प्रवाह :: भाग ५...

भाग ५

अरेंज मॅरेज या प्रकरणातून तुम्ही गेला असाल तर मझा तुम्हाला सलाम! देवाने तो घडवलेला आयुष्यातला सर्वात अवघड पेपर आहे. या मताला लग्न झालेल्या आणि होऊ घातलेल्या कोणाचेच दुमत असणार नाही. पहिल्या एक दोन फार फार तर चार पाच बघण्याच्या कार्यक्रमात मुला / मुली ला एक इंट्रेस्ट वा हूरहुर असते पण मजा पहा हाच आकडा पुढे गेला तर चिडचिड आणि अधिकच झाला तर फ्रस्ट्रेशन आणि शिगेला गेला तर मग कॉंप्रमाइज़ ची लेव्हल पण वाढते किंवा वाढवावी लागते म्हणाना!

तर मंडळी हे सर्व करता करता की काय वा कॉंप्रमाइज़ लेवेल वाढल्यामुळे शेवटी काही स्थळे पसंत पडतात आणि इतके दिवस चिडचिड करणारा तो / ती विचारात पडतात. नेमकी लहानपणी वाचलेली प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट आता आठवते आणि त्याचे केलेले विडंबन पण. (जिथे कुर्‍हाडी च्या जागी लाकूड तोड्याची बायको असते!) आता ही चेष्टा आपल्याच अंगाशी आली असे वाटते आणि आपला लाकूड तोड्या झाला आहे असे भासते! त्या गोष्टीमधे लाकूड तोड्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन देवाने त्याला तिन्ही कुर्‍हाडी दिल्या आणि गोष्टीचा शेवट गोड झाला पण हेच ईज़ी सल्यूशन या प्रॅक्टिकल सिचुयेशन मधे अप्लिकबल होत नाही ना!

मग सगळी आवडलेली प्रोफाइल्स परत पहिली जातात वेगवेगळ्या पॉइण्ट्स मधून विचार होतात.

तो:
नोकरी आहे पण गोरी नाही, गोरी आहे पण घरचे चांगले वाटत नाहीत, नोकरी आहे पण एकदमच फुटकळ, सॉफ्टवेर मधली आहे मग घरी किती वेळ देणार?
हे झाले वर पक्षाचे आता वधु पक्षा कडे पण काही परिस्थिती वेगळी नसते.

ती:
मुलगा ऑनसाइटला आहे / होता मग व्हेज असेलच कशावरून, अलीकडे स्मॉकिंग ड्रिंकिंग कॉमन होत आहे मग तो नाही ना करत असेल, पगार चांगला आहे पण जाड आहे, थोडे टक्कल आहे, हॅंडसम आहे पण नोकरी बेताचिच आहे.

अशी एक ना अनेक करणे इवॅल्यूयेट करून पहिली जातात. सेकेंड ओपीनियन घेतली जातात मित्रांकडून, मैत्रिणिंकडून, काका, मामा, ई. कडून. हि मंडळी आपापले मत देऊन मोकळे होतात आणि त्याच बरोबर हा निर्णय फार महत्वाचा आहे आणि तुझा तुलाच घ्यावा लागेल अशी नोट द्यायला पण विसरत नाहीत. अगदी सिगारेटच्या पाकिटावर वॉर्निंग मेसेज असतो तसाच! एथे मात्र या मुला / मुली ची अवस्था नेमकी आर्जुना सारखी होते आणि प्रत्येकाला पार्थ सारथी मिळतोच असे नाही.






मागील लिंक्स

प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४