Sunday, December 26, 2010

लाकूडतोडया.... all new revision....

प्रामाणिक (ला)कोड तोड्या

कलियुगातील गोष्ट आहे.

एका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers
राहत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक
कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी
करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste),
दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती
घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे
असा त्यांचा दिनक्रम असे.

एके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते.
म्हणून आपल्या खुराड्या(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या
आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन
कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप
तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात
पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून
बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,

"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"

कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले

"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप
नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ?
घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार ?"

जलदेवता म्हणाली, "रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."

इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर
आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता.
प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."

जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर
आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता.
प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."

जलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर
आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता.
प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हाच माझा लॅपटॉप !!"

जलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही
लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले.

दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप
पाहिला. त्याने विचारले, "मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप
कुठून आला ?" प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते
ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला.

दुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला.
तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला
लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना
पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,

"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"

कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले,

"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप
नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ?
घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे - नाही नाही - बायको आणि पोरे आहेत.
त्यांचे कसे होणार ?"

जलदेवता म्हणाली,

"रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."

इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization
करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले,

"यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ?"

लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला,

"माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता."

जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड
तोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.

कलियुगाचा महिमा :

प्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला.

लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना. मग
कंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला :)

लाकूडतोडया.... all new revision....

लाकूडतोडयाचा मुलगा !

लाकूडतोड्याचा मुंबईतला मुलगा प्रथमच बायकोला घेउन गावी आला होता. ज्या विहीरीत कु-हाड पडल्यामुळे सासर्याचा भाग्योदय झाला ती विहीर बघायची तिला फार ईच्छा होती.
'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच तोल जाउन ती विहीरीत पडते. आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते ! देव तत्परतेने बिपाशा बसूला बाहेर का...ढतो आणि ही का तुझी बायको ? असे विचारतो.
लाकूडतोड्याचा मुलगी आधी हो मग नाही मग परत हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो ! देव संतापून म्हणतो, कलीयुग म्हणतात ते हेच ! कोठे तुझा बाप आणि कोठे तू, या item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस ! थांब तुला शापच देतो ! मुलगा धावत देवाचे पाय धरून आपले म्हणणे पूर्ण ऐकून तरी घ्या म्हणून विनवतो. "देवा, तुमची ही जुनीच खोड आहे, तुम्ही आधी बिपाशा, मग करीना आणि शेवटी माझी लग्नाची बायको बाहेर काढली असतीत, माझ्या प्रामाणिक पणाला भूलून तुम्ही या दोन फटाकड्यापण माझ्या गळ्यात बांधल्या असतात. कायद्याने याला बंदी आहेच वर या महागाईच्या काळात एक बायको सांभाळणे जड जाते तर तीन सांभाळताना माझे तीन-तेराच झाले असते.".
हा खुलासा देवाला पटतो आणि बिपाशा बरोबर तो अदृष्य होतो. बराच वेळॅ थांबोन देव आपल्या मूळ बायकोला पण वर आणत नाही असे बघून "देवाची लीला अगाध आहे" असे म्हणत तो एकटाच घरी परततो !

Wednesday, August 18, 2010

Marathi PJ's

Monday, June 7, 2010

एक forward ...सर्वात श्रीमंत ...

शाळेने पत्रक काढलं,'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे,तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!

आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.गरीब मुलगा शोधायचा कसा?आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं,तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती.तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे."

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" "सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय.त्याने शिवलाय;पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा,मागून दोन ठिगळं लावलेली आहेत.चपला त्याला नाहीतच.मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो.तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही कालचीच असते.भाजी कुठली सर?गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे.शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी." मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत?

कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ,मोकळं होतं.त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,"पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराल सुबक परीच्छेद,समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई.माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये,या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!...,मी खूप कमी पडतोय. मयूर,गेल्या सहलीला आला नव्हता.अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती;पण त्याचं नाव यादीत नव्हतं.आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही. असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती.केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले.एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो.खरंच आहे,मुलांनी सुचवलेलं नाव.आर्थिक मदत,तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले.'मयूर जाधव,सातवी अ,अनुक्रमांक बेचाळीस' डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, "खात्री केलीये ना सर?कारण थोडीथोडकी रक्कम नाही.या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी,त्याचे शालेय शिक्षण साहित्य,गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे." मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, "सर,त्याची काळजीच करू नका.वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !" एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत,त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही. दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो.देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो.इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता.राग आवरावा तसा करारी चेहरा...

"सर,रागवू नका;पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."
"अरे,काय बोलतोयस तुला समजतय का?"
"चुकतही असेन मी.वाट्टेल ती शिक्षा करा;पण ते नाव ...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी,घशातला आवंढा,डोळ्यातलं पाणी ......
मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....? "सर,मला मदत कशासाठी?गरीब म्हणून?मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते.
शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला;पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो,"ठीक आहे.तुला नकोय ना ती मदत,नको घेऊस;पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
"सर,माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा,कुठल्याही विषयाच्या....त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय...खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना ? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर...सर,सांगा ना,मी गरीब कसा?"मयूर मलाच विचारत होता
आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच ......."
"सर,मदत कसली?माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल.शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर,मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! "
"म्हणजे?"
"वडील घरांना रंग द्यायचे काम करतात.Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते.तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात.चार पैसे मला मिळतात,ते मी साठवतो.सर,संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं.पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे.घरातले सगले काम करतात.काम म्हणज कष्ट.रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते.मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत.तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी.सर,माझ्या घरी याच तुम्ही,माझ्याकडे पु.ल.देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. .
.......सर,आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.
सर,शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो.रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान गातात!ऐकताना भान हरपून जातं."त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.
अभावितपणे मी विचारलं,"व्यायामशाळेतही जातोस?" "सर,तेवढी फ़ुरसत कुठली?घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो." अंगावर एक थरार उमटला...कौतुकाचा.
"मयूर मित्रा,मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा.."
"म्हणूनच म्हणतो सर......!"
"हे नाव ज्या कारणासाठी आहे,त्यात तू नक्कीच बसणार नाहीस.आमची निवड चुकली;पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल.शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून,हे पारितोषीक तरी........."
"सर,एवढ्यात नाही.त्याला वर्ष जाउ द्या.मी लिंकनचं,सावरकरांचं चरित्र वाचलं,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर,हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली.माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या,योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा;पण सर,नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल.जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल...सर.....प्लीज.....!"
वाचनानं,
स्पर्धांतल्या सहभागानं,
कलेच्या स्पर्शानं,
कष्टानं.......
त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती,
संस्कारामुळे नम्रतेची झालर होती.
आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता.
त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता.
परिस्थिती पचवून,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा !
श्रीमंत ! सर्वात श्रीमंत

Sunday, May 16, 2010

प्रवाह :: भाग - ६

प्रवाह भाग - ६

बऱ्याच दिवसात जुनी हिंदी गाणी ऐकली नव्हती म्हणून आज online radio tune केला आणि "जुस्त जू जिसकी थी उसको ..." या गाण्याचे शेवटचे कडवे चालू होते... "उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने..." आह S हा क्या बात है! काय ती रचना आणि तितकाच तोडीचा आशाजींचा आवाज. अशा या माहोल मध्ये विचार करताना मनाला जाणवले कि या एकटे पणामुळे बराच वेळ मिळतो नाही माणसाला?

नाही तर तुम्ही पहाना कोणीही onsite ला आलेला bachelor एकतर laptop नाही तर फोन वर दिसतो. बर हे फोन आणि laptop आणि त्यावरचे fwd एमैल्स, movies etc याचा हळू हळू कंटाळा येऊ लागतो मग वेळ घालवण्यासाठी नवीन नवीन options पहिले जातात. ट्रिप Adviser साईट पिंजून काढली जाते आणि लॉंग आणि शोर्ट पल्ल्याच्या पिकनिक स्पॉटची यादी केली जाते आणि नॉर्मल वीकेंड आणि लॉंग वीकेंड अशी विभागणी करून हे बेत पूर्णत्वाला नेले जातात. हळू हळू करत सगळे स्पॉट पाहून होतात. काही तर परत परत पाहून होतात. मग परत ये रे माझ्या मागल्या!

यातूनच मग "कीप इन टच" ला निभावण्यासाठी socalism चालू होते. Linked IN , ओर्कुट, facebook एक न अनेक साईट हेच कमी कि काय म्हणून लोकल मीट अप groups जॉईन केले जातात. Linked इन मधील नंबर आणि facebook / ओर्कुट मधील मित्र मैत्रिणींची गर्दी पाहून मन खुश होते आणि या plante वर आपण किती connected आहोत असे वाटते. नव्याचे नऊ दिवस होतात. एका निवांत क्षणी स्व: ताशीच विचार करताना मन विचारते हे Virtual Frined चा नंबर काय देतो तुला? हेच विश्व किती वेगळे होते काही वर्षा पूर्वी... ज्या वेळेस आपण सर्व मित्र एखाद्या चहाच्या दुकानात वा टपरीवर एकत्र जमून गप्पा टप्पा मारत होतो नाही तर तिलक वरचा वडा पाव आणि कटिंग . खरेच तीच जागा तीच मजा या ई स्पेस वर आहे का ? एखादा कूल scrap / tweet तितकाच आनंद देतो का जितका तुम्ही अचानक टपरीवरच्या मित्राला टपली देऊन आपले अस्तित्व दाखवता तेंव्हा, कि ज्या वेळी आपल्या नवीन पी जे ला टाळी मिळाली होती तेंव्हा, वा आपल्या चारोळीला वाह S वा मिळाली होती तेंव्हा. म्हणूनच हि ई - स्पेस एका मृगजळा सारखी भासते जिथे तुम्हाला मित्रांना भेटण्याचा बेगडी आनंद मिळतो त्याची तुलना आपल्या कट्ट्याशी कधीच करता येणार नाही!

असो अशी सत्याची ओळख होता होताच मग आपले जुने छंद आठवायला लागतात. शाळेत असताना दिलेल्या तबल्याच्या / पेटीच्या / गाण्याच्या / चित्रकलेच्या परीक्षा आठवतात. या चिमण्यांनो परत फिरा रे सारखे परत एकदा हे सगळे चालू करायला हवे याची आर्त जाणीव होते आणि मग शोधाशोध चालू होते. जुन्या पुस्तकांची , साहित्याची, मराठी मंडळाची , साहित्य मंडळाची ई. ची. परत एकदा रियाझ, तालीम चालू होते.

एकदम तंद्री भंग झाली ते रेडिओ वरच्या बदललेल्या गाण्याने "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..."


मागील लिंक्स...


प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

Thursday, May 13, 2010

असे का होते ....(एक कविता)

असे का होते ....
बोलायचे खूप असते पण शब्दच नसतात
बोलायचे खूप असते पण ऐकणारे कोणीच नसते

लाजून पाहणारे कोणी असते पण पाहणारा कोणीच नसतो
प्रेमाची साद देणारा आवाज असतो पण ऐकणारे कोणीच नसते

भावनेने आसुसलेले शब्द असतात पण कविता नाही होत
सुरेल संगीत मोहक आवाज असून महेफील रंगत नाही

झाडा वरच्या पानाला कळी बरोबर संसार नाही करता येत
पतंगाचे आणि मिणमिणत्या ज्योतीचे मिलन नाही होत

चंद्राच्या कलेला पण लागते पहावी आमावस्या
सागराच्या निळाइची खोली आणि हृदयातले प्रेम नाही येत मोजता

Monday, April 12, 2010

प्रवाह :: भाग ५...

भाग ५

अरेंज मॅरेज या प्रकरणातून तुम्ही गेला असाल तर मझा तुम्हाला सलाम! देवाने तो घडवलेला आयुष्यातला सर्वात अवघड पेपर आहे. या मताला लग्न झालेल्या आणि होऊ घातलेल्या कोणाचेच दुमत असणार नाही. पहिल्या एक दोन फार फार तर चार पाच बघण्याच्या कार्यक्रमात मुला / मुली ला एक इंट्रेस्ट वा हूरहुर असते पण मजा पहा हाच आकडा पुढे गेला तर चिडचिड आणि अधिकच झाला तर फ्रस्ट्रेशन आणि शिगेला गेला तर मग कॉंप्रमाइज़ ची लेव्हल पण वाढते किंवा वाढवावी लागते म्हणाना!

तर मंडळी हे सर्व करता करता की काय वा कॉंप्रमाइज़ लेवेल वाढल्यामुळे शेवटी काही स्थळे पसंत पडतात आणि इतके दिवस चिडचिड करणारा तो / ती विचारात पडतात. नेमकी लहानपणी वाचलेली प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट आता आठवते आणि त्याचे केलेले विडंबन पण. (जिथे कुर्‍हाडी च्या जागी लाकूड तोड्याची बायको असते!) आता ही चेष्टा आपल्याच अंगाशी आली असे वाटते आणि आपला लाकूड तोड्या झाला आहे असे भासते! त्या गोष्टीमधे लाकूड तोड्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन देवाने त्याला तिन्ही कुर्‍हाडी दिल्या आणि गोष्टीचा शेवट गोड झाला पण हेच ईज़ी सल्यूशन या प्रॅक्टिकल सिचुयेशन मधे अप्लिकबल होत नाही ना!

मग सगळी आवडलेली प्रोफाइल्स परत पहिली जातात वेगवेगळ्या पॉइण्ट्स मधून विचार होतात.

तो:
नोकरी आहे पण गोरी नाही, गोरी आहे पण घरचे चांगले वाटत नाहीत, नोकरी आहे पण एकदमच फुटकळ, सॉफ्टवेर मधली आहे मग घरी किती वेळ देणार?
हे झाले वर पक्षाचे आता वधु पक्षा कडे पण काही परिस्थिती वेगळी नसते.

ती:
मुलगा ऑनसाइटला आहे / होता मग व्हेज असेलच कशावरून, अलीकडे स्मॉकिंग ड्रिंकिंग कॉमन होत आहे मग तो नाही ना करत असेल, पगार चांगला आहे पण जाड आहे, थोडे टक्कल आहे, हॅंडसम आहे पण नोकरी बेताचिच आहे.

अशी एक ना अनेक करणे इवॅल्यूयेट करून पहिली जातात. सेकेंड ओपीनियन घेतली जातात मित्रांकडून, मैत्रिणिंकडून, काका, मामा, ई. कडून. हि मंडळी आपापले मत देऊन मोकळे होतात आणि त्याच बरोबर हा निर्णय फार महत्वाचा आहे आणि तुझा तुलाच घ्यावा लागेल अशी नोट द्यायला पण विसरत नाहीत. अगदी सिगारेटच्या पाकिटावर वॉर्निंग मेसेज असतो तसाच! एथे मात्र या मुला / मुली ची अवस्था नेमकी आर्जुना सारखी होते आणि प्रत्येकाला पार्थ सारथी मिळतोच असे नाही.






मागील लिंक्स

प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४


Sunday, March 28, 2010

प्रवाह :: भाग ४...

भाग ४

तुम्ही देव मानता का? या प्रश्नाचे उत्तर विचार करुन देणारे लोक पहीले की माला ज़रा विचार करावासा वाटतो आणि कौतूक पण.

थोड़या दिवासापुर्वी मी पण त्याच पक्षात होतो. आजची पऱिस्थिति वेगळी आहे. आज अंगरकिचा योग साधुन तळ्यातल्या गणपतीस गेलो. अपेक्षे प्रमाणे दुपारची वेळ असुनही रांग मोठी होती. रांगेतूनच मूर्ति कड़े पाहात होतो पण ती मला सांगत होती, अरे भक्ति वाढत आहे आणि मागण्या पण! मी एकटा कूठवर पुरणार?

आशी केविलवाणि मुद्रा पाहुन मी क्षण भर विचार केला आपले मागने काय? मी तर केवळ मन हलके होण्यासाठि आलो होतो. मागच्या काही दिवसात मन सुन्न झाले होते ते हलके करण्यासाठी आलो होतो. मोठ्या रांगेत असतानाच मी स्वत: शीच विचार करू लागलो...

एक आहे अजुन एक , या मित्राने घेतला, शेजार्‍या कडे आहे, याने पण घेतला त्याने पण घेतला मग मी का नाही? असे करत आपण आपल्या अपेक्षा वाढवत असतो. मग त्या आपले स्टॅंडर्ड बनतात, लाइफ स्टाइल होतात. यातूनच स्वत:ला रेस चा घोडा बनवतो आणि एका मागून एक रेस जिंकण्यासाठी धावत राहतो. मग कुणी दोन बेडरूम फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी तर कोणी मोठ्या फोर वीलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. या सर्व प्रकारात स्वत: वरचा मानसिक तणाव वाढवून न पेलणार्‍या जबाबदार्‍या पार पडाव्यात म्हणून देव, नवस, बाबा आणि मन्दिरा समोरच्या मोठ्या रांगा. आज हाच प्रश्न देव मला विचारात होता ज्यावेळी तू तुझेच निर्णय घेऊन या रेसच्या रिंगणात उतरलास तेव्हा मला विचारलेस का? नाही तर स्व त:लाच तरी एकदा?


मागील लिंक्स
प्रस्तावना
भाग १
भाग २
भाग ३

Sunday, March 14, 2010

प्रवाह :: भाग ३

भाग ३
जर तुमच्या बाबतीत तुम्ही ठरविले आणिक तसेच झाले असे अगर घडत असेल तर समर्थ रामदास स्वामींनी उल्लेखलेला "जगी सर्व सुखी असा कोण आहे" तुम्हीच आहात याची खात्री बाळगा. रिकामे मन सैतानचे घर एतकेसे खरे नसले तरी रिकामे मन आणि वेळ विचारांची फॅक्टरी असते एतके तरी नक्कीच खरे. बर्याच गोष्टींचा विचार करण्याच्या नादात घर कसे आले काही समजलेच नाही. या वेळेस घरी आलो तेव्हा घर कशी निरालेच भासले. अगदी सर्वांना भेटवस्तू देतांना पण तितकासा उत्साह नाही वाटला अर्थातच मला माहीत नाही तेच बाकीच्यान्चे होते का?

तसे या वेळेचा कालावधी काही चांगला नव्हता, बर्याच दु:खद प्रसंगांना सामोरे गेले होते घरचे आणि मी नसल्याने मला त्यांच्या समोर आपरधीपणा सारखे वाटत होते. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता आणि नंतर काही काळानंतर त्यावर एकदा नजर टाकता त्या वेळेस तुमहला तुम्ही विचारात न घेतलेल्या अनेक मुद्द्यांचा उलगडा होतो आणि आपली चुक कळते जी दुरुस्तीची वेळ निघून गेलेली असते. इन शॉर्ट पोस्ट डेप्लाय्मेंट इश्यूस, आता कसे एकदम परिचयाचा शब्द वाटला ना? तसेच काहीसे माझे झाले होते.

या वेळेस नेहेमी सारख्या गप्पा रंगल्या नाहीत कारण विषयच काहीसे तसेच होते. त्याच आजी सीरीयस असल्याची बातमी समजली. मागच्या पोस्ट डेप्लाय्मेंट इश्यूस मधून थोडे तरी शिकलो होतो "जिवंत माणसांच्या भावनांची किंमत फार मोठी असते मेलेल्या माणसाच्या दु:खा पेक्षा."

दुसर्या दिवशीच्या पहाटेच्या गाडीने गावी निघालो. दुपारी पोचल्यावर थेट आइ. सी. यू. मध्ये गेलो. इतके दिवस पुस्तकातून वाचलेले आणि टी. व्ही. सीरियल्स मधे पाहिलेले एकी कडे आसु आणि दुसरी कडे हसू म्हणजे काय याची प्रतेक्श जाणिव झाली ती आजीला आइ. सी. यू. मधे अनेक सलाइनच्या नळ्यांनी वेढलेले पाहून आणि तरीही तिची हसत मुख मुद्रा मला पाहून व विचारपूस करण्याची जिद्द पाहून. मंदिराच्या रांगेत चार चार तास थांबून दर्शनात जे सुख मिळणार नाही ते मे आज अनुभुवत होतो. पण ते क्षणभंगुर होते याची मला जाणीव नव्हती. आत्ता प्रयन्त मोठ्यांच्या तोंडी एकलेला "घर घर" लागणे शब्द आज मला दिसत होते. इतक्या वेदना आणि दु:ख आयुष्यात प्रथमच मी पाहत होतो. त्याच वेळेस मला समजले गौतम बुद्ध जेव्हा राज प्रासाद सोडून बाहेर आले त्यावेळेस बाहेरच्या जगातले दु:ख पाहून इतके उद्विग्न का झाले आणि स्वताला कसे आणि का बदलले. तसेच हे पण जाणवले की आजवर आपण किती सुखात जगत आहोत आणि ज्या वेदना भोगल्या त्या किती शुलल्क होत्या.

ती रात्र पोर्णिमेची होती. डॉक्टरची तपासणीची चक्कर झाल्यावर समोरच्या गणपती मन्दिरा मधे गेलो. डोळे मिटून नमस्कार केला आणि प्रश्न पडला काय मागवे? अजुन वेदना अजुन दु:ख आणि सहानशिलतेची परीक्षा की बस त्या वेदना? शेवटी काहीच न मागता नुसतेच सुखी ठेव वेदना दूर कर अशी मागणी करून मी परतलो.

दुसर्या दिवशी पहाटेचे रेलवेचे रिज़र्वेशन होते. रात्र कशी गेली कळलेच नाही. सकाळी गाडी मधे बसल्यावर वाईट बातमी कळली. विचार केला येणार्या स्टेशन वर उतरून परत जावे आणि काही दिवस मुक्काम वाढवावा. पण मन सांगत होते "बी प्रॅक्टिकल"! तसाच प्रवास पुढे चालू ठेवला पण एक आनंद होता मेलेल्या माणसाचे दु:ख करण्या पेक्षा जिवंत माणसाच्या भेटिचा आनंद महत्वाचा असतो!


मागील लिंक्स
प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

महात्मा गांधीजींवर भाषण...

महात्मा गांधीजींवर भाषण
ईयत्ता चवतीचा वर्ग. मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.
ईंन्स्पेक्टर आले.
शिकवल्याप्रमान पोर ऊटली.
'येक सात नम~~~~स्ते'
'बसा बसा मुलांनो.' ईंन्स्पेक्टर म्हनला.
'मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा. मी त्याला गणीतातील काही प्रश्न विचारतो.'
'मिथन्या ऊट. ' मास्तर.
मी ऊबा रायलो. ४७ मार्क झेऊन सामाईत पयला आल्तो बोल.
'१७ गुणिले ८ कीती होतात ?' ईंन्स्पेक्टरन ईचारल.
'अं ...अं ...' माजी हातभर फाटली.
मना त १० परयंतच पाडे येत वते.
'येकशे चालीस ' मी ठोकल.
'एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वरगातला सगळ्यात हुशार मुलगा ना? हा चक्क एकशे चाळिस सांगतो.?' ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.
'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'
ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.
ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल 'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?'
'सांगा.' ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.
'चंद्रकांत ऊट. भाषण कर.' मास्तर न आदेश दिला.
चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.
'मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी.
२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.
गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.
ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.
आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले.तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल. आनी ते भारतात परत आले.
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय. तो आरवा झाल्ता.

Sunday, March 7, 2010

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न ...........
वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं

आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं

म्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो

चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?

टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला

नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला

आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण

दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण

मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं

विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं

एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?

Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?

शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी

प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी

लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली

हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली

प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते

कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,

ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असत

मराठी भाषेची ताकद!

मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

 ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------


केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये'
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे


------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज,पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------
ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!

Sunday, February 28, 2010

प्रवाह :: भाग २

भाग २

विमानतळावर पोहचताच सामान चेकिनच्या रांगेत मी पहिलाच पाहून आनंद वाटला व उर्वरित प्रवास चांगला होणार याची पण चाहूल लागली. पण जसा जसा मी जास्त वेळ घालवू पाहत होतो तस तशी मला एक गोष्ट पटत होती की ज्या त्या गोष्टी त्यांच्या वेळेनुसरच होणे चांगले! ना फार आगोदर ना फार उशिरा! हे सगळे चेकिंग नंतरच्या वेटिंग मुळे कळले. आणि समजले की अनेक कारणानं  पैकी हे एक कारण आहे की ज्यामुळे मी या ट्रिप टाळतो एक तर मोठा प्रवासाचा वेळ आणि त्यात हा वेटिंग टाइम.

तशी लहानपणापासूनच मला प्रवासाची आवड. बराचसा प्रवास त्यावेळी बस नेच केलेला. पण त्या वेळेस कोणी ना कोणी तरी एस टी स्टॅंड वर सोडण्या साठी येत होते आणि बस चालू झळी की टाटा करून निरोप घेत होते. याच नेमक्या पद्धतीची आठवण आज मला प्रकर्षाने आली आणि त्या निरोप देणार्‍या नातेवाईकांची किंमत समजली. या छोट्या छोट्या गोष्टी पण किती महत्वाच्या असतात याची प्रचीती आली. कोणी तुम्हाला भेटण्यासाठी घरी आले आणि तुम्ही त्याला सोडण्या साठी साधे अपार्टमेंट च्या पार्किंग मधे वा जवळच्या बस स्टॉप अगर रिक्षा स्टॅंड पर्यन्त्र जरी गेलात तरी त्याला किती बरे आणि आपलेसे वाटते ते तुम्हाला नाही या अनुभवा शिवाय नाही कळणार. वाचून जरा हे पटणार नाही पण पहा कधी तरी फॉलो करून मग तो / ती पण पहा पोहोचल्याचा फोन / एस एम एस करतो / करते की नाही ते.

या ट्रिप मधे मला विमान प्रवासाचे काही अप्रूप नव्हते त्यामुळे मी विंडो सीट घेतली नव्हती. अजूनही मला माझी पहिली विमानाची ट्रिप आठवली की हसू येते. त्या वेळेस विंडो सीट साठी आटापिटा करून विमानत बसलो पण तो आनंद काही वेळच टिकला कारण एकदा टेक ऑफ झाले की शुभ्र ढगांची चादर सगळी कडे दिसत होती ती तरी किती वेळ पाहणार. एरव्ही बस नाही तर रेलवेच्या प्रवासात खिडकीतून बाहेर पाहण्यात जी मजा आहे ती एथे नाही हेच खरे.

मागील लिंक्स

प्रस्तावना
भाग १

Sunday, February 21, 2010

प्रवाह

प्रवाह




भाग १



कोणत्या एनआरआयला इंडिया ट्रिप नको असते? उत्तर सोपे आहे, सगळ्यांच हवी असते. पण का कोणास माहीत या वेळेस तिकीट बुकिंगला पण शक्य तेवढा उशीर करून पहिला उगाच मनाची समजूत घालत की तिकिटाचे रेट कमी होतील. नाताळ व नवीन वर्षयच्या सुट्टीचा फायदा घेत प्लान होणार्या ट्रिप चे जानावारी उजाडला तरी काही चिन्नह दिसेना. एकिकडे चाळ नावाच्या वाचळ वस्तीने हो मह्नजेच माझया जिभेने सगळ्या कंपनीतल्या कलीगला ही इंडिया ट्रिप नियोजनाची बातमी समजली होतीच मग काय रोज कोणी तरी माझया डेस्कवर येऊन नवीन वेब साइट चे नाव नाही तर तिकीट एजेंटचा नंबर देणार आणि दुसर्या दिवशी न चुकता फोलॉवप करणार. या सगळ्यालाच की काय वैतागून मी शेवटी तीन कोट्स निवडले. या निवडीवर एक मीटिंग घेण्यात आली ज्यामधे बर्याच लोकांनी बरेच सल्ले दिले आणि प्रत्यएकाचे वेगवेगळ्या एरलाइन्स चे अनुभव न विचारताच मला सुनावले. या मीटिंग मध्ये कमी तिकीट दर व कमी वेटिंग टाइम यांची सांगड घालून एक कोट फाइनल झाला. यात मला माझया पेक्षा दोन-तीन वर्ष इंडियाला न गेलेल्या मित्रांचाच हात अधिक होताअसे मला जाणवले. पण एक मात्र नक्की झाले की माझे इंडियाचे तिकीट जानेवरीचे बुक झाले!

तर ही बातमी हा हा म्हण ता सगळ्यांना समजली. त्यावर काही प्रतिक्रिया या अशा अजब होत्या:

१. वेळ काही चांगली नाही ही ओबामांची नवीन पॉलिसी वाचलीस का? यु.एस. कॉन्सुलेट ने रूल्स चेंज केले आहेत त्यामुळे जरा जपूनच हो. यात भर की काय काही लोकांनी वेगवेगळ्या अटर्नी च्या साइटचे मजकूर आणि वेब लिनक्स नि भरलेले ईमेल्स फॉर्वर्ड करणे चालू केले. काहींनी तर मला गिनिपिग ची उपमा दिली आणि मेल मधे लिहिले "एक गिनिपिग सिलेक्ट झला आहे. ऑल द बेस्ट फॉर ट्रिप!"

२. नुकताच एक सहकारी दोन इंडिया ट्रिप करून आला होता.( मुरलेल्या एन आर आइ वाचकांनी हरले असेलच) एक ट्रिप साखरपुडा आणि दुसरी लग्नासाठी. त्याला एकाकी वाटू लागले की मीच बकरा का असे वाटू लागल्याने त्याने दुसरी मेल ची चेन चालू केली ज्या मधे मी लग्नासाठी/ वधु शोध मोहीमेसाठी चाललो आहे. मग काय विचारता मंडळी जमेल त्या माणसाने मला त्याचा देशातल्या लग्न पद्धती बद्दल आणि आपल्या लग्ना बद्दल किस्से सांगायला सुरूवात केली. प्रतेक जण शेवटी मात्र छ द मी पणे हसून ऑल द बेस्ट सांगण्यास विसरला नाही.

३. काही सहकार्यांनी आपली यादी सांगितली आणि फोन नंबर पत्ता ई. टिपून घेतला आणि तो आपापल्या इंडियाच्या घरी कळवला. काही लोकांनी एका कुटुंबाला सध्या तिथे किती खर्च येतो ते पाहावयास सांगितले तर काहींनी रियल एस्टेट मार्केट कसे आहे त्याचा स्टडी करण्यास. काहींनी तर चक्क उतरल्यावर एक मूठ माती घे आणि थोडी कपाळाला लाव आमच्या तर्फे असे सुनावले आणि आपले देश प्रेम दाखवून दिले.

आता या गोष्टी एकीकडे चालू असताना माझी खरेदी मोहिम जोरात चालू होती आणि आता एक इंडिया ट्रिपचे फील येत होते!

प्रस्तावना

बर्‍याच दिवसात काही लिहीणे झाले नाही मग आता जरा वेळ मिळतो आहे तर त्याचा उपयोग या लिखाणा साठी करावा असा विचार केला आणि या वीकेंड पासून दर वीकेंड ला एक ललित या ब्लॉग वर प्रवाह या सदरा खाली लिहीण्याचा संकल्प केला आहे. नेहमी प्रमाणे त्याला आपली दाद मिळेल याची खात्री आहे. नामनाला घडी भर तेल घालवण्या पेक्ष्या लगेच नवीन पोस्ट कडे वळू. आपल्या कॉमेंट्स द्यायला विसरू नका.

प्रस्तावना

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५ 

भाग ६

Thursday, January 21, 2010

Bayko...