Sunday, June 25, 2017

स्पर्श

स्पर्श
दुपारची वेळ होती, नक्की कोणता वार ते आठवत नाही पण लंच साठी तो company cafeteria मध्ये गेला होता. नेहमीं प्रमाणे ही गर्दी होती कारण दुपारचा एक वाजला होता आणि तो cafeteria दोन चार कंपनी मध्ये कॉमन होता. तो नुकताच लॉन्ग onsite ट्रिप वरून आला होता.  परत इंडिया मधील ट्रॅफिक,  गोंगाट, गर्दी ची सवय करून घेत भिर भिरत्या नजरेने(थेट डोळ्यात पाहण्याची सवय गेली होती) रिकामे टेबलं शोधत होता
इतक्यात एक ओळखीचा आवाज कानावर पडला, नक्की कधी आणि कोणी अशी हाक मारली होती हे आठवता आठवता कानापेक्षा डोळ्यांनी बाजी मारली. तोच ओळखीचा चेहेरा, तिचा!
क्षणभर US ची फॉर्मॅलिटी कि पुणेरी कोरडा नमस्कार अशा व्दिधे मध्ये असताना नजरानजर झाली. आणि तिनेच handshake साठी हात पुढे केला त्याने पण तिचा हात हातात घेतला काही क्षणच! तो थंड स्पर्श, ओलावलेले डोळे, भरून आलेला आवाज, तिच्या गळ्यातले मंगळसूत्र हे सारे ती काहीच न बोलता खूप सांगून गेले. दोन क्षण कोठे आहोत याचे भान राहिले नाही. spellbound ते काय याची अनुभूती आली. निरव शांतता वाटत होती इतक्या गर्दी मध्ये. पुढे काय बोलावे हा प्रश्न दोघांना पडलेला.
नंतर जुजबी गप्पा आटोपून तो लंच साठी गेला. पण त्या भेटी नंतर त्याचे मन सैरभैर झाले. जेवण कधी संपले, कोण काय बोलत आहे या कशामध्येच तो कुठे नव्हता.
तो एक स्पर्श त्याला जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन गेला. त्याला आपले उमेदीचे दिवस एकदम डोळ्या समोर आले.(आता पण जास्त वय झाले नव्हते अर्ली तिशीत पण I. T च्या जगात लगेच ओल्ड होते!) कॉलेज संपल्यावर दोन एक वर्ष छोट्या कंपनी मध्ये काम केल्यावर एक चांगला ब्रेक मिळाला होता एका मोठ्या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये. सगळेच नवीन वातावरण होते, एक दम polished कॉर्पोरेट ऑफिस.  नवीन प्रोजेक्ट, नवीन आणि मोठी टीम, सिनियर- ज्युनिअर मेम्बर्स चा चॅन मिक्स. जसे हवे होते तसेच होते सगळे! कंपनी ची बस सर्विस होती पण ती घरापासून लांब असल्यामुळे तो जवळच्या ऑफिस लोकेशन पर्यन्त गाडी भरून जात असे आणि तिथून बस. एक दिवस नवीन कॉलेज पास आऊट ची batch जॉईन झाली, काही नवीन चेहेरे त्याच्या पण प्रोजेक्ट टीम मध्ये आले. त्यातलाच एक रोज बस मध्ये पण दिसू लागला.  रोजच्या बस प्रवासात कधी आणि कशी ओळख वाढली ठाऊक नाही. रोजचे ऑफिस ला जाण्याचे मोटिवेशन प्रोजेक्ट वर्क कि तिच्या बरोबरचा प्रवास हे एक कोडेच होते. रोज ऑफिस मध्ये कधी एकटे बोलणे होते नसे बस काय ते बसच्या प्रवासातच. आता हळू हळू प्रोजेक्ट आणि कंपनी या टॉपिक वरून  गप्पांची गाडी पुढे गेली होती... नवीन नाटक, मूवी, घरचे प्रोग्राम्स, होमटाउन, कॉलेज लाईफ असे बरेच विषय होते. त्याला पण आता जास्त उत्साह आला होता. आता ते ऑफिस मध्ये पण टी ब्रेक ला नाही तर लंच ब्रेक ला एकत्र जात होते. काही सिनियर टीम मेम्बर्स ना आता हे दिसत होते, काही तरी चालू आहे यांचे, कोणी चेष्टा मस्करी मध्ये बोलून पण दाखवत होते, पण ते दोघे हसण्यावारी नेत. एक दिवस तो बराच अपसेट होता बहुदा expected प्रोमोशन झाले नव्हते, मग त्याने नवीन जॉब शोध चालू केला. तिला पण सांगितले , ती काहीच बोलली नाही.
आणि एक दिवस त्याने नवीन जॉब आणि वाढीव पगार बद्दल तिला सांगितले. ती पण खूपच खुश होती त्याच्या नवीन जॉब च्या बातमीवर. जस जसा नोटीस पिरियड चा एक एक दिवस जात होता तशी त्याला जाणीव होत होती तो तिला मिस करणार! आता त्याने पुढे जाण्याचे प्रयन्त चालू केले, वीकएंड ला भेटूयात का? मूवी नाही तरी हॉटेल मध्ये जाऊयात का? असे विषय आणत तो रोज तिच्या बरोबर बस मध्ये बोलत असे.  पण ती अजून तयार नव्हती. दिवसा गणिक त्याची घालमेल वाढत होती. इकडे नवीन नौकरी चा जॉइनिंग चा दिवस जवळ येत होता आणि तिचा काही होकार येत नव्हता. तसे अजून त्याने पण तिला थेट विचारले नव्हते लग्नासाठी. त्याच्या सेंड ऑफ च्या दिवशी ती आलीच नाही ऑफिसला.
त्याने नवीन ऑफिस सुरु केले, त्या धावपळीत एक आठवडा बोलणेच झाले नाही त्यांचे. आता मात्र त्याने ठरवले एक दिवसाआड तरी फोन करायचा. असा एक महिना गेला, नवीन कंपनी मधून त्याला ऑन साईट ची ऑफर आली, तो पण खूप खुश होता. तिने या वेळेस पण नवीन जॉब  सारखेच काहीच एक्सप्रेस केले नाही. याचा पण आता ऑन साईट ला गेल्या वर तिच्या बरोबर काँटॅक्ट कमी झाला, टाइम झोन आणि कॉस्टली फोन कॉल्स. अशीच एक दोन वर्ष गेली. आणि हळू हळू कॉन्टॅक्ट कमी कमी होत गेला.

आज एकदम साऱ्या आठवणी मनाच्या कॅनवास वर चितारून गेल्या त्या एका स्पर्शाने!

No comments:

Post a Comment