असे का होते ....
बोलायचे खूप असते पण शब्दच नसतात
बोलायचे खूप असते पण ऐकणारे कोणीच नसते
लाजून पाहणारे कोणी असते पण पाहणारा कोणीच नसतो
प्रेमाची साद देणारा आवाज असतो पण ऐकणारे कोणीच नसते
भावनेने आसुसलेले शब्द असतात पण कविता नाही होत
सुरेल संगीत मोहक आवाज असून महेफील रंगत नाही
झाडा वरच्या पानाला कळी बरोबर संसार नाही करता येत
पतंगाचे आणि मिणमिणत्या ज्योतीचे मिलन नाही होत
चंद्राच्या कलेला पण लागते पहावी आमावस्या
सागराच्या निळाइची खोली आणि हृदयातले प्रेम नाही येत मोजता
Thursday, May 13, 2010
Monday, April 12, 2010
प्रवाह :: भाग ५...
भाग ५
अरेंज मॅरेज या प्रकरणातून तुम्ही गेला असाल तर मझा तुम्हाला सलाम! देवाने तो घडवलेला आयुष्यातला सर्वात अवघड पेपर आहे. या मताला लग्न झालेल्या आणि होऊ घातलेल्या कोणाचेच दुमत असणार नाही. पहिल्या एक दोन फार फार तर चार पाच बघण्याच्या कार्यक्रमात मुला / मुली ला एक इंट्रेस्ट वा हूरहुर असते पण मजा पहा हाच आकडा पुढे गेला तर चिडचिड आणि अधिकच झाला तर फ्रस्ट्रेशन आणि शिगेला गेला तर मग कॉंप्रमाइज़ ची लेव्हल पण वाढते किंवा वाढवावी लागते म्हणाना!
तर मंडळी हे सर्व करता करता की काय वा कॉंप्रमाइज़ लेवेल वाढल्यामुळे शेवटी काही स्थळे पसंत पडतात आणि इतके दिवस चिडचिड करणारा तो / ती विचारात पडतात. नेमकी लहानपणी वाचलेली प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट आता आठवते आणि त्याचे केलेले विडंबन पण. (जिथे कुर्हाडी च्या जागी लाकूड तोड्याची बायको असते!) आता ही चेष्टा आपल्याच अंगाशी आली असे वाटते आणि आपला लाकूड तोड्या झाला आहे असे भासते! त्या गोष्टीमधे लाकूड तोड्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन देवाने त्याला तिन्ही कुर्हाडी दिल्या आणि गोष्टीचा शेवट गोड झाला पण हेच ईज़ी सल्यूशन या प्रॅक्टिकल सिचुयेशन मधे अप्लिकबल होत नाही ना!
मग सगळी आवडलेली प्रोफाइल्स परत पहिली जातात वेगवेगळ्या पॉइण्ट्स मधून विचार होतात.
तो:
नोकरी आहे पण गोरी नाही, गोरी आहे पण घरचे चांगले वाटत नाहीत, नोकरी आहे पण एकदमच फुटकळ, सॉफ्टवेर मधली आहे मग घरी किती वेळ देणार?
हे झाले वर पक्षाचे आता वधु पक्षा कडे पण काही परिस्थिती वेगळी नसते.
ती:
मुलगा ऑनसाइटला आहे / होता मग व्हेज असेलच कशावरून, अलीकडे स्मॉकिंग ड्रिंकिंग कॉमन होत आहे मग तो नाही ना करत असेल, पगार चांगला आहे पण जाड आहे, थोडे टक्कल आहे, हॅंडसम आहे पण नोकरी बेताचिच आहे.
अशी एक ना अनेक करणे इवॅल्यूयेट करून पहिली जातात. सेकेंड ओपीनियन घेतली जातात मित्रांकडून, मैत्रिणिंकडून, काका, मामा, ई. कडून. हि मंडळी आपापले मत देऊन मोकळे होतात आणि त्याच बरोबर हा निर्णय फार महत्वाचा आहे आणि तुझा तुलाच घ्यावा लागेल अशी नोट द्यायला पण विसरत नाहीत. अगदी सिगारेटच्या पाकिटावर वॉर्निंग मेसेज असतो तसाच! एथे मात्र या मुला / मुली ची अवस्था नेमकी आर्जुना सारखी होते आणि प्रत्येकाला पार्थ सारथी मिळतोच असे नाही.
मागील लिंक्स
प्रस्तावना
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

Sunday, March 28, 2010
प्रवाह :: भाग ४...
भाग ४
तुम्ही देव मानता का? या प्रश्नाचे उत्तर विचार करुन देणारे लोक पहीले की माला ज़रा विचार करावासा वाटतो आणि कौतूक पण.
थोड़या दिवासापुर्वी मी पण त्याच पक्षात होतो. आजची पऱिस्थिति वेगळी आहे. आज अंगरकिचा योग साधुन तळ्यातल्या गणपतीस गेलो. अपेक्षे प्रमाणे दुपारची वेळ असुनही रांग मोठी होती. रांगेतूनच मूर्ति कड़े पाहात होतो पण ती मला सांगत होती, अरे भक्ति वाढत आहे आणि मागण्या पण! मी एकटा कूठवर पुरणार?
आशी केविलवाणि मुद्रा पाहुन मी क्षण भर विचार केला आपले मागने काय? मी तर केवळ मन हलके होण्यासाठि आलो होतो. मागच्या काही दिवसात मन सुन्न झाले होते ते हलके करण्यासाठी आलो होतो. मोठ्या रांगेत असतानाच मी स्वत: शीच विचार करू लागलो...
एक आहे अजुन एक , या मित्राने घेतला, शेजार्या कडे आहे, याने पण घेतला त्याने पण घेतला मग मी का नाही? असे करत आपण आपल्या अपेक्षा वाढवत असतो. मग त्या आपले स्टॅंडर्ड बनतात, लाइफ स्टाइल होतात. यातूनच स्वत:ला रेस चा घोडा बनवतो आणि एका मागून एक रेस जिंकण्यासाठी धावत राहतो. मग कुणी दोन बेडरूम फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी तर कोणी मोठ्या फोर वीलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. या सर्व प्रकारात स्वत: वरचा मानसिक तणाव वाढवून न पेलणार्या जबाबदार्या पार पडाव्यात म्हणून देव, नवस, बाबा आणि मन्दिरा समोरच्या मोठ्या रांगा. आज हाच प्रश्न देव मला विचारात होता ज्यावेळी तू तुझेच निर्णय घेऊन या रेसच्या रिंगणात उतरलास तेव्हा मला विचारलेस का? नाही तर स्व त:लाच तरी एकदा?

Wednesday, March 24, 2010
Subscribe to:
Posts (Atom)